अनुदान योजना संपल्याने शेतकऱ्यांचीच दूध कोंडी

ऐन दिवाळीत कमी दराने दूध विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

पुणे – राज्यातील शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर 25 रुपये भाव देण्यासाठी शासनाने दिलेली मुदत 31 ऑक्‍टोबर रोजी संपली. त्यानंतर या योजनेला अद्याप मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे अनेक सहकारी दूध संघांनी ही योजना बंद केली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत कमी दराने दूध विक्री करावी लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनुदान देण्याची तीन महिन्यांची योजना होती. तिला मुदतवाढ देण्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी नुकतेच जाहीर केले असले, तरी अजून याबाबतचे लेखी आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे खासगी व सहकारी दूध संघ संभ्रमात पडले आहेत. हे लेखी आदेश दिले नसले, तरी काही दूध संघांनी शेतकऱ्यांना पंचवीस रुपये दर देण्याचे कायम ठेवले आहेत. पण, ते फार काळ देता येणार नाही, अशी परिस्थिती आहे.

राज्यातील दूध संघ व शासनाच्या आदेशानुसार 1 ऑगस्टपासून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना “आम्ही प्रतिलिटर 25 रुपये भाव दिला आहे. मात्र, शासनाने आतापर्यंत फक्त ऑगस्टचे अनुदान दिले आहे. सप्टेंबर व ऑक्‍टोबरचे अनुदान अद्याप पदरात पडलेले नाही. दुग्धविकास विभागाचे अधिकारी या योजनेसाठी डेअरीनिहाय नियुक्त करण्यात आलेले होते. ही योजना समाप्त झाली,’ असे सांगत या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे.

“राज्यातील दहा लाख शेतकऱ्यांच्या दूध अनुदानाचा गंभीर प्रश्‍न ऐन दिवाळीत तयार झालेला आहे. दोन महिन्यांचे अंदाजे 150 कोटी रुपये अनुदान थकविल्यामुळे शेतकरी आणि डेअरीचालकदेखील अडचणीत आले आहेत. अनुदानासाठी अत्यावश्‍यक असलेल्या शेतकरी याद्या, बॅंक स्टेटमेंट व अत्यावश्‍यक कागदपत्रे आम्ही आधीच दुग्धविकास विभागाकडे दिली आहेत. अनुदान अडविल्यामुळे दुष्काळ आणि दिवाळीच्या तोंडी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

दूध संघांचेही आदेश
राज्य शासनाने स्पष्ट आदेश न काढल्यामुळे अनेक प्लान्टचालकांनी ही योजना बंद केली. यामुळे शेतकऱ्यांना वाढीव 5 रुपये अनुदान देणे देखील थांबविण्यात आलेले आहे. “5 रुपये अनुदानाची योजना 1 ऑगस्ट ते 31 ऑक्‍टोबरपर्यंत होती. पुढील मुदतवाढीचा आदेश शासनाने काढलेला नाही. त्यामुळे अनुदान स्थगित करण्यात येत आहे, असे आदेश सहकारी दूध उत्पादक संघांनी काढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)