अनुदानित गॅस सिलिंडर 2.94 रूपयांनी महागला

सहा महिन्यांत 14 रूपयांची दरवाढ

नवी दिल्ली – जनसामान्यांना एकीकडे पेट्रोल, डिझेल दरवाढीतून काहीसा दिलासा मिळत असतानाच; दुसरीकडे गॅस सिलिंडर दरवाढीचा दणका बसला. स्वयंपाकासाठी घरगुती वापर होणारा अनुदानित सिलिंडर (14.2 किलो वजनी) बुधवारी 2.94 रूपयांनी महागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ताज्या दरवाढीमुळे अनुदानित सिलिंडर 505.34 रूपयांना मिळेल. आधी त्याचा दर 502.40 रूपये इतका होता. जूनपासून सलग सहा महिने सिलिंडर दरवाढीचे सत्र सुरू आहे. या कालावधीत मिळून सिलिंडर 14.13 रूपयांनी महागला आहे. सिलिंडरच्या मूळ दरात झालेल्या बदलावरील करप्रभावामुळे तो महागला आहे. बाजारमुल्यानुसार मिळणारा विनाअनुदानित सिलिंडर 60 रूपयांनी महागला आहे. आता विनाअनुदानित सिलिंडर 880 रूपयांना मिळेल. प्रत्येक कुटूंबाला दरवर्षी 12 अनुदानित सिलिंडर मिळतात. ते बाजारमुल्यानुसारच खरेदी करावे लागतात. मात्र, त्यावरील अनुदानाची रक्कम ग्राहकाच्या थेट बॅंक खात्यात जमा केली जाते. अनुदानाची रक्कम ऑक्‍टोबरमध्ये 376.60 रूपये इतकी होती. नोव्हेंबरसाठी ती 433.66 रूपये इतकी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)