अनुदानित गॅस सिलिंडर 1 रूपया 76 पैशांनी महाग

नवी दिल्ली – मूळ किमतीच्या बदलावरील कर प्रभावामुळे स्वयंपाकासाठी घरगुती वापर होणारा अनुदानित गॅस (एलपीजी) सिलिंडर 1 रूपया 76 पैशांनी महागला. नवा दर मंगळवारची मध्यरात्र उलटल्यानंतर लागू करण्यात आला.

ग्राहकांना बाजारभावानुसार 14.2 किलो वजनी एलपीजी सिलिंडर खरेदी करावा लागतो. मात्र, केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटूंबाला दरवर्षी 12 अनुदानित गॅस सिलिंडर पुरवले जातात. संबंधित अनुदानाची रक्कम ग्राहकाच्या बॅंक खात्यात थेट जमा होते. एलपीजीचा आंतरराष्ट्रीय दर आणि परकी विनिमय दरानुसार प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या रकमेत बदल होतो. आंतरराष्ट्रीय दर वाढल्यास सरकारकडून अधिक अनुदान दिले जाते.

-Ads-

मात्र, कर नियमांनुसार एलपीजीच्या बाजाराभावानुसार त्यावरील जीएसटीची आकारणी होते. या जीएसटीचा विचार करून ताजी दरवाढ झाली आहे. सार्वजनिक इंधन कंपन्या दर महिन्याच्या अखेरीस एलपीजी दराचा आढावा घेतात. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला एलपीजीचा दर बदलतो किंवा जैसे थे राहतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)