अनुदानावरील व्याजासाठी 20,339 कोटी रुपयांची तरतूद – अरुण जेटली

आर्थिक सर्वेक्षणात तपशील नमूद

नवी दिल्ली – देशभरातील शेतकऱ्यांसाठी 2017-18 या आर्थिक वर्षात लघु मुदतीच्या कृषी कर्जाच्या अनुदानावरील व्याजापोटी केंद्र सरकारने 20,339 कोटी रुपये मंजूर केले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षणात याबाबतचे तपशील नमूद करण्यात आले आहेत.

विशेषत: छोट्या शेतकऱ्यांना संस्थांद्वारे पतपुरवठ्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे भरमसाठ व्याजदर आकारणाऱ्या सावकारांच्या पाशातून त्यांची सुटका झाल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. ई-नाम अर्थात इलेक्‍ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार या उपक्रमाच्या माध्यमातून कृषी उत्पादनाला स्पर्धात्मक दर उपलब्ध करुन देणारे व्यासपीठ प्राप्त झाले आहे. एप्रिल 2016 मध्ये या उपक्रमाचा प्रारंभ झाल्यावर सहा महिन्याच्या कालावधीसाठी साठा केलेल्या किसान क्रेडिट कार्ड धारक छोट्या व कमान शेतकऱ्यांना 2 टक्के दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.

2022 सालापर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी मुद्रा आरोग्य कार्ड, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, ई-नाम अशा अनेक उपक्रमांचा समावेश असल्याचे आर्थिक सर्वेक्षणात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)