अनुत्पादक मालमत्तेमुळे ओव्हरसीज बॅंकेला 3606 कोटींचा तोटा

नवी दिल्ली – अनुत्पादक मालमत्तेच्या गाळात अडकलेल्या बॅंकाचे तोटा असलेले ताळेबंद जाहीर करणे सुरूच आहे. आज इंडियन ओव्हरसीज बॅंकेने जाहीर केलेल्या ताळेबंदानुसार या बॅंकेला चौथ्या तिमाहीत तब्बल 3606 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षीही या तिमाहीत बॅंकेला 646 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या तिमाहीत बॅंकेला खराब कर्जापोटी 6774 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. बॅंकेचे ढोबळ एनपीए 25.28 टक्‍क्‍यावर गेले आहे.

तर निव्वळ एनपीए 15.33 टक्‍के आहे. या ताळेबंदामुळे बॅंकेच्या शेअरवर नकारात्मक परिणाम झाला. गेल्या आठवड्यात बऱ्याच सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी तोटा वाढल्याचा ताळेबंद जाहीर केला आहे. यामुळे रिझर्व्ह बॅंकेने अधिक अनुत्पादक मालमत्ता असलेल्या बॅंकांच्या कामकाजावर या अगोदरच अंशत: मर्यादा आणलेल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)