अनुत्पादक मालमत्ता वाढल्यामुळे आणखी काही बॅंकांवर निर्बंध शक्‍य 

मुंबई – सार्वजनिक क्षेत्रातील आणखी सहा बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेकडून निर्बंध (पीसीए) घातले जाण्याची शक्‍यता आहे. या बॅंकांमध्ये पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी), युनियन बॅंक ऑफ इंडिया आणि सिंडिकेट बॅंक यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश असण्याची शक्‍यता आहे. जर निर्बंध आणले गेले तर आर्थिक स्थिती खालावलेल्या बॅंका मोठ्या बॅंकांमध्ये विलीन करण्याची केंद्रीय अर्थ मंत्रालयाची योजना प्रलंबित राहण्याची शक्‍यता आहे. तसंच, या बॅंकांकडून कर्ज मिळण्यास अडचणी येऊ शकतात. अर्थ मंत्रालयाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या सहा बॅंका सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्या आहेत.

त्यामुळे रिझर्व्ह बॅंक त्यांना कोणतीही सवलत देण्यास तयार नाही. पुढील महिन्याभरात जर आरबीआयने या बॅंकांना पीसीए श्रेणीत टाकले तर निर्बंध घालण्यात येणाऱ्या बॅंकांची संख्या 17 वर पोहोचणार आहे. यापूर्वी गेल्या महिन्यातच अलाहाबाद बॅंकेला आरबीआयने या श्रेणीमध्ये टाकले आहे. देना बॅंकेलाही नवी कर्जे देण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्या बॅंकांवर निर्बंध घातले जातात, त्यांच्या शाखांची संख्या न वाढवता तोट्यातील शाखा बंद करण्यावर भर दिला जातो. या शिवाय त्यांचा लाभांशही रोखला जाण्याची शक्‍यता असते. बॅंकेच्या कर्जवितरणावरही बंदी घातली जाते. अनेक अटी आणि शर्ती घातल्यानंतरच त्यांचा कर्जवितरणाचा मार्ग मोकळा होतो. त्यातच गरज पडल्यास रिझर्व्ह बॅंकेतर्फे संबंधित बॅंकेच्या लेखापरीक्षणाची आणि पुनर्रचनेचेही आदेश दिले जाऊ शकतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)