अनुकंपा तत्वाखाली नोकरभरतीला बंदी नाही ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

शिपायाच्या विधवा पत्नीला दिलासा ; नोकरीत सामावून घेण्याचे आदेश

मुंबई: राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार सरसकट नोकर भरतीला बंदी घालण्यात आली असली तरी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीला ती लागू होत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. अनुकंपा तत्वाखाली नोकर भरतीचा उद्देश हा मृत व्यक्तीच्या कुटूंबाला आर्थिक अडचणीवर मात करणे असा आहे. ती नव्या पदाची नियुक्ती नाही. त्यामुळे अपुकंपा तत्वाखाली नोकरभरतीला ही बंदी लागू होत नाही, असे स्पष्ट करून न्यायालयाने समिता देसाई यांची नवऱ्याच्या पदावर केलेल्या नियुक्तीला मान्यता दिली. तसेच नियुक्त करण्यात आलेल्या तारखेपासून वेतनही द्यावे, असे स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिंधुदूर्गमधील बांदा तालूक्‍यातील एका माध्यमिक शाळेमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या समीर देसाई यांचे नोव्हेंबर 2011 मध्ये निधन झाले. त्यांच्या पदावर त्यांची पत्नी समिता हिला अनुकंपत्वावर शाळेच्या संचालक मंडळाने फेब्रुवारी 2012 मध्ये नियुक्‍त करून मान्यतेसाठी प्रस्ताव सिंधुदूर्ग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविला. मात्र शासनाच्या नोकरभरती बंदीच्या आदेशानुसार हा प्रस्ताव फेटाळून लावला.
शिक्षणांधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात समिता देसाई यांच्यावतीने ऍड. एन. व्ही बांदीवडेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी ऍड. बांदीवडेकर यांनी अनुकंपा तत्वावरील नोकर भरती ही नवीन पद तयार करून करण्यात येणारी भरती नाही. ती मृत व्यक्तीच्या कुटूंबाला आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी त्याच्या कुटूंबातील एका व्यक्तीला देण्यात येणारी नोकरी आहे. त्यामुळे नोकर भरती बंदी या पदासाठी लागू होत नाही, असा दावा केला. तो न्यायालयाने मान्य करून समिता देसाई यांच्या नियुक्तीला मान्यता देऊन नियुक्त केल्यापासून त्यांना वेतन देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)