“अनिस’च्या फटाकेमुक्त अभियानाला भोरमध्ये मोठा प्रतिसाद

शाळांतील 3 हजार 748 विद्यार्थ्यांनी वाचवले लाखो रुपये

भोर- “अनिस’च्या भोर शाखा आणि जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भोर तालुक्‍यातील एकूण 25 माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये दीपावली पूर्वी “फटाकेमुक्त दिवाळी अभियान’ राबवले होते. या अभियानातील चांगल्या बाबींचे अनुकरण करत 3 हजार 748 विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प पत्राद्वारे करून पालकांचे लाखो रुपये वाचवले असल्याची माहिती भोर तालुका “अनिस’च्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
“अनिस’चे फटाकेमुक्त दिवाळी अभियान यशस्वी करण्यासाठी डॉ. अरुण बुरांडे, कॉ. ज्ञानोबा घोणे, विवेक पोळ, संतोष देशमाने, सविता कोठावळे यांनी भोर तालुक्‍यातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे फटाके वाजवण्याचे दुष्परिणाम, वृद्ध-आजारी रुग्णांना होणारा त्रास, ध्वनीचे आणि हवेचे प्रदूषण, जंगल तोड आणि पर्यावरणाची होणारी हानी… या विषयी प्रबोधन करून “विचार करा’ या पत्रकांचे वाटप करून फटाके वाजवणे हे शंभर टक्के अनुचित असल्याचे पटवून दिले होते.
या अभियानाचा चांगला परिणाम होऊन हजारो विद्यार्थ्यांनी दिवाळीत फटाके न वाजवण्याचा निर्णय घेतल्याने पालकांचे लाखो रुपये वाचले असल्याचे “अनिस’तर्फे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)