अनिश्चिततेत ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ ठरू शकतील अशा कंपन्या (भाग-२)

अनिश्चिततेत ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ ठरू शकतील अशा कंपन्या (भाग-१)

मागील वर्षी माझ्या लेखात मी एका गोष्टीचा उल्लेख केलेला होता तो म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन व आपली जीडीपी यांचं गुणोत्तर. एकूण मार्केट कॅपिटलायझेशन जे त्यावेळीस जीडीपीच्या १०० टक्क्यांहून अधिक होतं व त्या वेळेस बाजार महाग असल्याबद्दलचं देखील सूतोवाच केलेलं होतंच.  तर तेच मार्केट कॅपिटलायझेशन आता साधारणपणे ७८ टक्क्यांच्या आसपास आहे. पुढील दोन तिमाहींच्या रिझल्ट्सच्या अंदाजांवरून हीच टक्केवारी जर बाजार याच पातळीवर राहिला तर ७५ टक्क्यांपर्यंत येऊ शकते. एकूणच या महिन्याच्या शेवटपर्यंत लागत जाणारे कंपन्यांचे निकाल, नंतर जाहीर होणारं हंगामी बजेट, त्यानंतर येणारे कंपन्यांचे वार्षिक अहवाल, त्यापाठोपाठ होणाऱ्या निवडणुकांचे निकाल लागून येणारं सरकार व त्यामागोमाग पर्जन्यमानाचं अनुमान इत्यादी घडामोडी या नक्कीच बाजारावर परिणाम करणाऱ्या असतील. बाजारातील काही तज्ञ मंडळी निफ्टी ९५०० च्या गोष्टी करताना दिसत आहेत तर काही जण १२००० च्या बाता करताना. तर अशा या वातावरणात अनेक संधी आपणास सापडू शकतील कारण जोखीम व संधी या हातात हात घालून येतात व योग्य त्या वेळी अचूक संधीचं रूपांतर फायद्यात करणं म्हणजेच खरी कला आहे.त्यासाठी, खालील तक्त्यामध्ये काही निवडक कंपन्या दिलेल्या आहेत, ज्या येणाऱ्या अनिश्चिततेत व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग ठरू शकतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनिश्चिततेच्या वातावरणातआपण आपली गुंतवणूक काढून घेतल्यास आपण तात्पुरते नुकसान कायमस्वरूपी हानीमध्ये रूपांतरित करतअसता मात्र जर आपण अशा वेळीस गुंतवणूक केल्यास आपण तात्पुरती संधी कायमस्वरूपी संपत्तीमध्ये रूपांतरित करू शकता, पर्याय निवडणं आपल्या हातात आहे.मग बाजारासाठी हे वर्ष कसंही असो, तेजी असो वा मंदी, पैसा कमाना तो बनता हैं, याविषयी आणखी थोडं पुढील लेखात..


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)