अनिवासी भारतीयांना संधी (भाग-१)

चालू वर्षात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सुमारे 11 ते 12 टक्‍क्‍यांहून अधिक कोसळला आहे. अशा स्थितीत परदेशातून पैसा पाठवणाऱ्या अनिवासी भारतीयांना 11 ते 12 टक्के अधिक रक्कम मिळत आहे. त्यामुळे अनिवासी भारतीय हे भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करून अधिक फायदा मिळवू शकतात.

देशातील रिअल इस्टेट क्षेत्र 3 हजार अब्ज रुपयांचे आहे आणि त्यात 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अनिवासी भारतीयांकडून केली जाते. याचाच अर्थ सात ते आठ टक्के मालमत्ता एनआरआयकडून खरेदी केली जाते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचा दर आजघडीला 11-12 टक्‍क्‍याने घसरला असल्याने अनिवासी भारतीयांकडून या क्षेत्रात गुंतवणूक वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तज्ञांच्या मते, रिअल इस्टेट क्षेत्रात सुधारणांसाठी सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमुळे रोजगारासाठी परदेशात गेलेल्या युवक-युवतींत भारतातील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढला आहे. अशा स्थितीत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने त्यांना आपल्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

अनिवासी भारतीयांना संधी (भाग-२)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कसा होणार फायदा?
उदा. एखाद्या अनिवासी भारतीयाने 2017 मध्ये भारतात 65 लाखांची एखादी मालमत्ता खरेदी केली असेल. त्यावेळी डॉलरचच्या तुलनेत रुपयाचे मूल्य हे 65 रुपये होते. या हिशोबाने त्याने एक लाख डॉलरची रक्‍कम पाठवून त्याने मालमत्ता खरेदी केली. मात्र सध्याच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 74 रुपयांच्या आसपास आहे. अशा स्थितीत त्या व्यक्तीला जर 65 लाखांची मालमत्ता खरेदी करायची असेल तर त्याला एक लाख डॉलर नाही तर सुमारे 88 हजार डॉलर पाठवावे लागतील. अशा स्थितीत त्याला बारा हजार डॉलरची बचत होईल. कालांतराने तीन वर्षांनी त्याने मालमत्ता विक्री करायचे ठरवले तर त्याला मिळणारा परतावा हा विक्रमी असेल. याशिवाय सध्याच्या काळात रिअल इस्टेट बाजारात मालमत्तेच्या किंमतीत सुमारे 15 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली आहे. अशा स्थितीत एखाद्या एनआरआयला मालमत्ता 15 टक्‍क्‍यापेक्षा कमी किंमतीत मिळेल. यातून मालमत्ता खरेदी करणाऱ्या अनिवासी भारतीयाचे फायद्याचे मार्जिन आणखीच वाढेल.

– किर्ती कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)