अनिवासी भारतीयांना संधी (भाग-२)

चालू वर्षात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सुमारे 11 ते 12 टक्‍क्‍यांहून अधिक कोसळला आहे. अशा स्थितीत परदेशातून पैसा पाठवणाऱ्या अनिवासी भारतीयांना 11 ते 12 टक्के अधिक रक्कम मिळत आहे. त्यामुळे अनिवासी भारतीय हे भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करून अधिक फायदा मिळवू शकतात.

अनिवासी भारतीयांना संधी (भाग-१)

मालमत्ता कोठे खरेदी करावी
अनिवासी भारतीयांनी महानगराच्या आसपास मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करायला हवा. स्मार्ट सिटीअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांतर्गत अनेक शहरांचा विकास केला जात आहे. यासाठी महानगराजवळच जमीन खरेदीचा फायदा होईल. एकीकडे मालमत्ता शहराबाहेर असल्याने कमी किंमतीत जागा मिळेल आणि त्याचबरोबर स्मार्टसिटीतंर्गत शहराचा विस्तार होईल, तेव्हा ही जमीन विकासाच्या कक्षेत येईल. यातून जमिनीची किंमत अनेक पटीने वाढेल आणि गुंतवणूकदाराला चांगला फायदा होईल. त्यामुळे शहरात घर किंवा फ्लॅट खरेदी करण्याऐवजी शहरालगत परिसरात जमीन खरेदी करणे अधिक हिताचे ठरू शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घर घेण्याचाही लाभ
एखादा अनिवासी भारतीय शहरात फ्लॅट खरेदी करू इच्छित असेल तर निवासी भागात घर खरेदी करणे फायद्याचे ठरते. कोणताही व्यक्ती जेव्हा गुंतवणूक करतो, तेव्हा दोन-तीन वर्षानंतर विक्री करून फायदा काढण्याचा विचार करतो. मात्र निवासी भागात घर घेण्याचा फायदा म्हणजे ते घर भाड्याने देऊन लाभाचे मार्जिन हळूहळू वाढवू शकतो. जोपर्यंत मालमत्ता विकली जात नाही, तोपर्यंत त्या घरातून रेंट मिळत राहतो.

मालमत्तेची मागणी वाढली
एखाद्या गोष्टींची मागणी वाढली की त्याची किंमत ही आपोआप वाढते. हा नियम सध्याच्या काळात प्रॉपर्टी बाजारालाही लागू होण्याची शक्‍यता आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ञांच्या मते, अधिक फायद्याची अपेक्षा बाळगून असलेल्या अनिवासी भारतीयांकडून देशातील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीत रस वाढत चालला आहे. यातून रिअल इस्टेटच्या किंमतीत वाढ होऊ शकते. सध्याच्या काळात मालमत्तेच्या किंमतीत 15 टक्के घट झालेली असताना या क्षेत्रात गुंतवणूक वाढल्यास मालमत्तेच्या किंमतीत कालांतराने पंधरा टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वाढ होऊ शकते.

– किर्ती कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)