अनिवासी भारतीयांची गुंतवणूक वाढली

डॉलरच्या तुलनेत रुपया दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर रिअल इस्टेट बाजारपेठेत अनिवासी भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर रस घ्यायला सुरुवात केली आहे. जाणकारांच्या मते, रुपया कमकुवत होण्याचे कारण तर आहेच; शिवाय प्रॉपर्टीच्या बाजारात पारदर्शकता वाढविण्यासाठी पावले उचलल्यामुळेही अनिवासी भारतीयांची या बाजाराकडील रुची वाढली आहे.

गेल्या आठवड्यात रुपयाचे मूल्य अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 73 पर्यंत खाली आले. या घसरणीकडे परदेशी संस्थात्मक तसेच व्यक्तिगत गुंतवणूकदार संधी म्हणून पाहत आहेत. गेल्या काही महिन्यांत झालेल्या घडामोडी पाहता, अनिवासी भारतीय रिअल इस्टेट बाजारात पैसा गुंतविण्यात खूपच रुची दाखवू लागले आहेत. या बाजारातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी वेळोवेळी अनेक उपाययोजना केल्या जात असल्यामुळे गुंतवणुकीची भावना अधिक दृढ झाली आहे. रिअल इस्टेट बाजार सुमारे तीन हजार अब्ज रुपयांचा असून, त्यापैकी 7 ते 8 टक्के प्रॉपर्टी अनिवासी भारतीयांकडून खरेदी केल्या जातात. मात्र, अलीकडील काळात रुपयाचे मूल्य घसरल्यामुळे अनिवासी भारतीयांची गुंतवणूक वाढण्याचे कारण म्हणजे, प्रॉपर्टी खरेदीत दहा टक्‍क्‍यांची आपल्याला सूट मिळत आहे, अशीच भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे.

– जगदीश काळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)