अनिल कपूरच्या डायलॉगमुळे गेली पाकिस्तानी पोलिसाची नोकरी

इस्लामाबाद – बॉलिवूडमधील “शूट आऊट ऍड वडाला’ सिनेमातील अभिनेता अनिल कपूरचा एक फेसमस डायलॉग बोलणे आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल करणे, पाकिस्तानातील एका पोलीस अधिकाऱ्याला प्रचंड महाग पडले आहे. या डायलॉगबाजीमुळे पोलीस अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. पाकिस्तानातील पाकपतानमधील कल्याणा पोलीस स्टेशनमधील कार्यरत पोलीस अधिकारी अरशद यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये अरशद 2013मध्ये बॉक्‍सऑफिसवर रिलीज झालेल्या ‘शूटआऊट ऍट वडाला’ सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग ‘दो वक्त की रोटी खाता हूं, पाच वक्त की नमाज पढता हूँ…इससे ज्यादा मेरी जरुरत नही और मुझे खरीदने की तेरी औकात नही’, हा डायलॉग बोलताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचला. यानंतर पाकपतानमधील जिल्हा पोलीस अधिकारी मारिक महमूद यांनी अरशद यांना तातडीनं निलंबित केले. याप्रकरणी त्यांची चौकशीदेखील करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)