अनिल अंबानींविरोधात अटक वॉरंट जारी 

मधेपुरा (बिहार): रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. कारण त्यांच्याविरोधात बिहारच्या मधेपुरा सिव्हिल न्यायालयो अटक वॉरंट जारी केला आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने एका व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोबदला न दिल्याने हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मधेपुरा जिल्ह्यातील बेहरी गावाचे रहिवासी सैनी साह यांचा 13 जुलै 2011ला आसामच्या तिलोई गावात ट्रक अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढला होता. 16 ऑगस्ट 2011 रोजी सैनी यांची आई कौशल्या देवी यांनी मोबदल्यासाठी विमा कंपनीवर दावा दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने सैनी यांच्या कुटुंबियांस 28 फेब्रुवारी 2017 रोजी 18 लाख 83 हजार रुपये आणि त्यावर 9% टक्के वार्षिक व्याज देण्यास सांगितले. पण तरीही मोबदला न मिळाल्याने कौशल्या देवी यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने यासंदर्भात कंपनीला दोन वेळेस नोटीस बजावली. पण नोटीसला कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.
त्यानंतर कंपनीचे चेअरमन अनिल अंबानी यांना अटक करण्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. तसेच न्यायालयाकडे महाराष्ट्राच्या डीजीपी यांच्या माध्यमातून अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करत न्यायालयाने अनिल अंबानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)