अनियमित विमान सेवा देणाऱ्या एअर डेक्कनला ब्लॅकलिस्ट करा

कोल्हापूर – कोल्हापूर – मुंबई विमान सेवा एअर डेक्कन कंपनीने कोणतेही सबळ कारण न देता अचानक बंद केली. त्यामुळे पर्यटक, उद्योजक यांची कुचंबणा झाली. व्यावसायिक नितीमुल्यांचे पालन न करणाऱ्या एअर डेक्कन कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकावे आणि स्पाईस जेट किंवा इंडिगो यासारख्या विमान कंपनीला कोल्हापूर – मुंबई सेवा देण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेमध्ये केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लहान शहरांना मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी सन 2015 मध्ये उडाण योजना आखली. त्यामध्ये कोल्हापूरचा समावेश झाल्याने, 6 वर्षे खंडित असलेली विमान सेवा सुरू झाली आणि 17 एप्रिल 2018 ला एअर डेक्कन कंपनीकडून कोल्हापूर – मुंबई – कोल्हापूर या मार्गावर विमान उड्डाण होवू लागले.

-Ads-

पहिले दोन महिने ही विमान सेवा नियमित आणि वेळेवर सुरू होती. जवळपास 90 टक्के बुकींग आणि पुढील तीन महिन्याचे आरक्षण होत असल्याने, ग्राहकांचा प्रतिसादही उत्तम असायचा. तरीही एअर डेक्कन कंपनीने कोणतेही संयुक्तीक कारण न देता, अचानक कोल्हापूर – मुंबई विमान सेवा बंद केली. त्यामुळे पर्यटक, भाविक, उद्योजक यांची कुचंबणा झाली. बेभरवशाची आणि अनियमित विमान सेवा देणार्या एअर डेक्कन कंपनीला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावे आणि इंडिगो, स्पाईस जेट किंवा एअर एशिया या कंपन्यांना कोल्हापूरच्या विमान तळावरून हवाई वाहतुक सेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)