अनियंत्रित ठेवी स्वीकारण्यास बंदी

नवी दिल्ली- गुंतवणुकदारांची फसवणूक टाळण्यासाठी सरकारने कोणत्याही आस्थापनांना आता ठेवी स्वीकारण्यास बंदी घालयचे ठरवले असून त्या विषयीचे एक विधेयक आज संसदेत सादर करण्यात आले. अनियंत्रित ठेवी बंदी योजना 2018 असे या विधेयकाचे नाव आहे.

देशात अनेक कंपन्या किंवा व्यापारी आस्थापना नागरीकांकडून जादा व्याजाचे अमिष दाखवून ठेवी स्वीकारतात. सरकार किंवा अन्य कोणत्याहीं नियंत्रक संस्थांची अनुमती न घेता यापुढे या ठेवी स्वीकारण्यास संबंधीतांना या कायद्याद्वारे बंदी घातली जाणार आहे. अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्‍ला यांनी लोकसभेत हे विधेयक सादर केले. या ठेवींमुळे देशातील अनेक गरीब व मध्यमवर्गीयांना लुटण्यात आले आहे. त्यामुळे सरकारला हे विधेयक आणून त्यावर नियंत्रण आणावे लागत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)