अनावश्‍यक कॉलपासून होणार सुटका दूरसंचार विभाग विकसित करणार नवे ऍप अनावश्‍यक कॉलपासून होणार सुटका, दूरसंचार विभाग विकसित करणार नवे ऍप 

नवी दिल्लुी: अनावश्‍यक येणाऱ्या फोन कॉल्सपासून मोबाइल धारकांनाची आता सुटका होणार आहे. केंद्र सरकारकडून नवीन ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. उमंग व्यासपीठावर डीएनडी 2.0 नावाचे ऍप ट्रायकडून मंगळवारी सादर करण्यात आले आहे.
ऍपला डाऊनलोड करण्यासाठी प्लेस्टोअवर जाऊन आपण आपल्या मोबाइलमध्ये या सुविधेचा वापर आपल्याला येणाऱ्या अनावश्‍यक कॉलपासून सुटका होणार आहे. असे लॉंचिंगदरम्यान ट्रायकडून सांगण्यात आले. उमंग या व्यासपीठावरुन हे ऍप डाऊनलोड करण्यात आल्याने इतर कोणतेही ऍप नको असलेले फोन कॉल्सपासून मुक्ती मिळण्यास याच ऍपचा उपयोग करता येणार आहे.
टेलिकम्युनिकेशन मार्केटिंग कंपन्या ग्राहकांना मोबाइलवर फोन करुन आपल्या कंपनीच्या सुविधाची माहिती देण्यात येते. यामुळे ग्राहकांना असुरक्षित वाटत असल्याचे मत नोंदवण्यात आले आहे. तर यातून अनेक समस्या निर्माण होत असतात. याकरिताच ट्रायने मागील वर्षी माय स्पीड आणि माय कॉल या नावानी एक ऍप लॉंच करण्यात आले आहे.
डिजिटल इंडियाचे प्रमोशन आणि एक सरकारी सेवा देणारी यंत्रणा यांना एकाच पातळीवर समांतर ठेवण्याकरिता मागील वर्षांपासून सरकारकडून प्रयत्न चालू आहेत.
यात मागील जूनमध्ये उमंग ऍपचे लॉंच करण्यात आले होते. सुरुवातीला गॅस बुकिंग, सरकारी दवाखाने आणि महत्त्वाच्या सेवाकरिता आठ सुविधाचा समावेश या ऍपमध्ये करण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण ट्रायकडून देण्यात आले आहे.
आणखीन 100 हून जादा सुविधाचा या ऍपमध्ये समावेश असून याला एक एका नंबरमधून कॉल करण्याची सुविधा देण्यात आली.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)