पुणे – राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था तसेच जिल्हा परिषदांना आपापल्या पातळीवरील अनधिकृतपणे चालविल्या जाणाऱ्या शाळांची यादी जाहीर करण्याचे आदेश देऊन पंधरा दिवस उलटले तरीही अद्याप पुण्याच्या महापालिका प्रशासनाकडून अद्याप अनाधिकृत शाळांची यादीच तयार करण्यात आलेली नाही.
अनाधिकृत शाळांची यादी बनविण्याचे काम हाती घेतले असून कनिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना दिल्या आहेत. लकवरच पालिकेकडून अनाधिकृत शाळांची यादी जाहीर केली जाईल.
धनंजय परदेशी, उपशिक्षण प्रमुख
महापालिका शिक्षण विभाग
राज्यात शिक्षण विभागाची परवानगी न घेता अनेक शाळा सुरु आहेत. दरवर्षी अशा अनाधिकृत शाळांची यादी प्रवेश होण्यापुर्वी जाहीर केली जाते. सध्याच्या काळात अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा या अनाधिकृतपणे चालविल्या जात आहेत. मात्र यावर कोणचेही नियंत्रण आहे की नाही अशी शंका निर्माण होते आहे. दरवर्षी अशा प्रकारची यादी जाहीर केली जाते मात्र प्रत्यक्ष शाळांवर कारवाई केली जात नाही. यंदा तर एप्रिल महिना संपत आला तरीही या अनाधिकृत शाळांची यादीच प्रशासनाकडून जाहीर झालेली नाही.
राज्यातील अनाधिकृत शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाच्या अनेक शाळांचा समावेश आहे. या शाळांनी शालेय शिक्षण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतरच त्यांना शाळा चालविण्याची परवानगी असते. मात्र पुण्यात आजमितीला अशा अनेक शाळा आहेत ज्यांनी प्रमाणपत्र घेतलेले नाही. मागील वर्षी पुणे जिल्ह्यातून 71 शाळांना अनाधिकृत ठरविण्यात आले होते. अनेक सीबीएसईच्या शाळा या एप्रिल महिन्यातच सुरु होतात. त्यामुळेन अनेक पालकांनी आतापर्यंत पुढील वर्षीसाठीचे प्रवेशही शाळांमध्ये घेतले आहेत. पालिकेच्या या दिरंगाईमुळे मनपा हद्दीतील अनाधिकृत शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा