अनाधिकृत बांधकाम; आठ जणावर गुन्हा

सर्वजण यवतेश्‍वरचे रहिवाशी
सातारा यवतेश्‍वर येथे महसुल विभागाच्या जागेत अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी आठ जाणांवर गुन्हा दाखल झाला.अनाधिकृत बांधकाम काढण्याच्या नोटीसा बजावूनही टाळाटाळ केल्याने सातारा तालुका पोलिस ठाण्यात यवतेश्‍वर येथील आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

यवतेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. अशी तक्रार असल्याने त्याची पाहणी काही दिवसांपुर्वी महसुली यंत्रणेने केली होती. पाहणीवेळी तयार केलेल्या अहवालात त्याठिकाणी आढळलेली अनाधिकृत बांधकामे काढण्यासाठीच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटीसा बजावूनही त्याठिकाणचे अतिक्रमण संबंधितांनी काढले नाही.

त्यामुळे रणजित आनंदराव मोरे, संदीप अविनाश पवार, जालिंदर काळू उंबरकर, अतुल प्रभाकर घोडके, लक्ष्मण गणपत कदम, दिनकर दगडू शिर्के, सविता यशवंत साळुंखे, संतोष वामन पवार ( सर्व . यवतेश्वर, ता.सातारा) यांच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याची तक्रार संदीप वनवे (रा.विकासनगर, खेड) यांनी दिली आहे. याचा पुढील तपास उपनिरीक्षक शिवाजी जाधव करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)