अनाधिकृत नोकरी प्रकरणी समितीने विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देण्यास टाळाटाळ

नांदेड,दि.20 (प्रतिनिधी) – बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरीस लागलेल्या व्यक्तीला चौकशी लावण्यात आली होती. मात्र, चौकशी समितीने मागीतलेल्या खुलासाबाबत त्या व्यक्तीने काहिच खुलासा केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे समिती पुढे काय पाऊले उचलणार यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे नौकरी मिळविणाऱ्या शंकर गोविंद गोरे यांना संस्थेकडून पदाहून काढण्यात आले. तसेच 1 वर्षापासून त्यांचे वेतन रोखण्यात आले. विशेषता: द्विसदस्यीय समितीकडून सखोल चौकशी करण्यात आली होती. यामध्ये गोरे यांना तोंडी आणि लेखी खुलासा देण्यास सांगितले असतांनाही अद्यापही गोरे यांनी समितीला खुलासा दिला नाही. गोरे यांना सेवेतून कमी का करण्यात येवू नये असे समितीने बजावले होते.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालयात सन 1992 ला निर्देशक पदावर शंकर गोविंद गोरे यांची निवड प्रक्रियेवरद्वारे निर्देशक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्या नेमणूकीत त्यांनी सन 1992 ला आपले (अनूसुचित जाती) जातीचे प्रमाणपत्र बोगस सादर करुन नौकरी हस्तगत केल्याचा प्रकार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांने उघड केल्याने या संस्थेतील गैरकारभाराचा भांडाफोड चांगला गाजत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)