अनाथांच्या कल्याणासाठी सर्वोतोपरी मदत

शिरूर- शिरूर तालुका सराफ व सोनार असोसिएनच्या वतीने अनाथ मुलांच्या कल्याणासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही सराफ असोसिएशनचे नेमीचंद फुलफगर व शिरूर तालुका सोनार समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक कुलथे यांनी दिली. समस्त सुवर्णकार समाज मंडळ शिरूर तालुका यांच्या वतीने श्री. संत शिरोमणी नरहरी महाराज यांची 733 वी पुण्यतिथी शिरूर रामलिंग रोड येथील माहेर संस्थेच्या अनाथ मुलांना सोबत साध्या पद्धतीने साजरी कारण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करून पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माहेर संस्थेतील अनाथ मुलांना अशोक कुलथे यांच्या वतीने कपडे व खाऊ वाटप करून मुलांना सोबत पुण्यतिथी साजरी केली. यापुढे माहेर संस्थेला प्रत्येक वर्षी 21 हजार रुपये देणगी देण्याचे संस्थेच्या वतीने कार्याध्यक्ष धर्मा मैड यांनी जाहीर केले. यावेळी अध्यक्ष अशोक कुलथे, तालुका अध्यक्ष नेमीचंद फुलफगर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र जाधवराव, लक्ष्मण कालेवार, कार्याध्यक्ष धर्माभाऊ मैड, दिलीप वर्मा, योगेश वाळकीकर, गोपाल कुलथे, बाजार समितीचे माजी सचिव दिलीप मैड, अशोक टाक,नागरे, संजय वेदपाठक, युवा संघटना अध्यक्ष आदित्य मैड, मयुर मिसाळ, भारतीय भटके विमुक्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित पंडित, प्रशांत टकले, कृष्णा मैड, अभिजित शहाणे, अजय कुलथे, महाबली मिसाळ, श्रीकांत मैड, स्वप्निल माळवे, आनंद कुलथे, आकाश कुलथे, ओंकार मैड, प्रशांत मैड यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)