अनर्थ टळला! बालदिन कार्यक्रमावेळी अंगणवाडीला आग

पुणे – बालदिनाचा कार्यक्रम सुरू असताना एका अंगणवाडीला बुधवारी दुपारी भीषण आग लागली. धनकवडी येथील हत्ती चौकात ही घटना घडली. दिवाळीच्या सुट्टीमुळे येथे केवळ आठच मुले हजर होती. कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणच्या शेजारच्या खोलीला प्रथम आग लागली. तेथील रखवालदाराच्या लक्षात हा प्रकार आल्यावर तातडीने कार्यक्रम थांबवून मुलांना बाहेर काढण्यात आले. या आगीत अंगणवाडीतील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

धनकवडीतील हत्ती चौकामध्ये राज्य सरकारच्या एकात्मिक बाल सेवा योजनेअंतर्गत बालविकास प्रकल्प राबवला जातो. येथे 139 क्रमांकाची अंगणवाडी आहे. यामध्य बुधवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास बाल दिनानिमित्त कार्यक्रम सुरू होता. यावेळी शेजारील एका खोलीला आग लागली. ही बाब लक्षात येताच कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणी रखवालदाराने धाव घेतली. यानंतर शिक्षकांनी तातडीने मुलांना वर्गाबाहेर काढले. थोड्या वेळातच ही आग भडकून कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणी पसरली. यामध्ये अंगणवाडीतील कपाट, मुलांची खेळणी व इतर कागदपत्रे जळून खाक झाली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि टॅंकर दाखल झाला. त्यांनी आग अवघ्या 15 मिनिटांत आटोक्‍यात आणली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्‍यता अग्निशमन दलाने वर्तवली आहे.

आणखी एका सदनिकेला आग
दरम्यान, चैतन्यनगर येथे दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेलाही एकच्या सुमारास आग लागली. ही आगही अग्निशमन दलाने विझविली. या सदनिकेतील रहिवाशी बाहेरगावी गेले असल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी नागलकर यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)