अनमोल अंबानींच्या पहिल्याच डीलमध्ये रिलायन्सला तब्बल ‘एवढा’ फायदा

मुंबई : अनमोल अंबानी यांनी केलेल्या पहिल्याच व्यवहारात रिलायन्स कॅपिटल समूहाला मूळ गुंतवणुकीच्या 25 पट जास्त नफा मिळाला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार अनमोल अंबानींनी रिलायन्स समूहाचा कोडमास्टर्स या कंपनीतला 60 टक्के हिस्सा संस्थात्मक गुंतवणूकदारांना विकला आहे. कोडमास्टर्स ही इंग्लंडमधली गेम डेवलप करणारी कंपनी आहे. या कंपनीचे 90 टक्के शेअर्स रिलायन्सने 2009मध्ये 100 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

नुकत्याच झालेल्या डीलमध्ये अनमोलने या कंपनीतील 60 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना त्यानं हे शेअर्स 1700 कोटी रुपयांना विकले. दहा वर्षापूर्वी ज्या 60 टक्के शेअर्ससाठी रिलायन्सने 66.67 कोटी रुपयांची गुंतवणूक केली त्याचे आता 1700 कोटी रुपये म्हणजे 25 पट झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)