अनधिकृत बांधकाम प्रश्‍न मार्गी लावणार : मुख्यमंत्री फडणवीस

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचे अनेक प्रश्‍न प्रलंबित असताना, शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाबरोबरच अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावले आहेत. आता शहराला भेडसावणाऱ्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍नदेखील निश्‍चितपणे सोडवू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
भाजपच्या अटल संकल्प महासंमेलनात मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर शनिवारी (दि. 3) हे संमेलन पार पडले.

फडणवीस म्हणाले की, अनधिकृत बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. या कायद्यातील अन्य तरतुदी लक्षात घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. एखाद्या आरक्षित जागेवरील बांधकामे नियमित करावयाची झाल्यास, त्याजागेच्या बदल्यात दुसरी जागा ठेवावी लागणार आहे. त्याठिकाणी हे आरक्षण विकसित करावे लागणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. पोलीस आयुक्तालयाची मागणी प्रलंबित मागणी असुनही 15 वर्षे सत्ता असताना देखील कॉंग्रेस-राष्ट्रवादीला ते काम करता आले नाही. भाजपने ते काम मार्गी लावले. शास्तीकराबाबत निर्णय घेतला आहे. याठिकाणच्या पाण्याचा प्रश्‍नाबरोबरच पिंपरी-चिंचवडकरांना दिलेली सर्व आश्‍वासने सोडविल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे यावेळी ते म्हणाले.

आमदार महेश लांडगे यांनी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली. बैलगाडा शर्यत व पुणे-नाशिक महामार्गाच्या कामात राजकारण केले जात आहे. दुसऱ्याची बदनामी करून राजकरण करता येत नाही. राजकारण ही खासगी मालमत्ता नसून, जो जनतेचे काम करीन, तोच निवडून येईल,असे सांगत महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्यासाठी मी स्वत: आग्रही असताना ही युती न केल्याने भोसरीतून शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून येऊ दिला नाही.

शिवसेना म्हणजे शेखचिल्ली – भेगडे
भाजप जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. मंत्री मंडळातील निर्णयाला शिवसेनेचे मंत्री संमती दर्शविवात. मात्र, या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर ते भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. ज्यांच्यासोबत सत्ता उपभोगत आहे. त्यांच्यावरच टीका करणारी शिवसेना म्हणजे शेखचिल्ली असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)