अनधिकृत बांधकाम न थांबविल्याने सहायक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई

मुंबई – येथील पायधुनी इस्माईल कर्टे रोडवरील नऊ मजली इमारतीतील अनधिकृत बांधकाम न थांबवता कर्तव्यात कसूर करणाऱ्या सी वार्डचे वार्ड ऑफीसर तथा सहायक आयुक्तांसह बीट ऑफीसर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत केली. यासंदर्भात हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनीही दिले होते.

पायधुनी येथे बेकायदेशीररित्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्यासंदर्भात सदस्य शरद सोनावणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना डॉ.पाटील बोलत होते. ते म्हणाले, याप्रकरणी अनधिकृत बांधकाम करणाऱ्याविरूद्ध मुंबई महापालिका अधिनियम व एमआरडीपी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची सूचना म्हाडा कार्यालयाने बृहन्मुंबई महापालिकेस केली होती. अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत अधिनियमाच्या कलम ३५४ अ नुसार नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र या नोटीसनुसार अनधिकृत बांधकाम न थांबविता सी वार्डातील सहायक आयुक्त (वार्ड ऑफीसर), बीट ऑफीसर यांनी कर्तव्यात कसूर व कारवाईत विलंब केल्याने त्यांचे निलंबन केले जाईल, असे डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)