अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चिंचवड येथील चालू असलेल्या अनधिकृत बांधकामवर शनिवारी कारवाई करण्यात आली.

“ब’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 17 चिंचवड, येथे अनधिकृत बांधकामे सुरु होती. या चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेच्या अनधिकृत विभागाने आज हातोडा चालविला. त्यामध्ये एक वीटबांधकाम व एक आरसीसी बांधकामावर क्षेत्रफळ अंदाजे 413.33 चौरस फुटावर कारवाई करण्यात आली.

कार्यकारी अभियंता मकरंद निकम, यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता केशव फुटाणे यांच्यासह इतर कनिष्ठ अभियंता, बीट निरिक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)