अनधिकृत फेरीवाला कारवाईस “हिरवी झंडी’

प्रशासनाचा कारवाईचा अभिप्राय स्थायी समितीने स्वीकारला

पुणे – अनधिकृत फेरीवाल्यांबाबत नागरिकांकडून वारंवार प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत वाहतुकीला अडथळा करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा प्रशासनाचा अभिप्राय स्थायी समितीने स्वीकारला असून आता अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई होणार हे निश्चित झाले आहे.

महापालिकेच्या जुन्या हद्दीत आणि पेठांमध्ये अ, ब, क वर्गवारीतील व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याला जागा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे “ड’ आणि “ई’ वर्गवारीतील व्यावसायिकांचे वाहतुकीचे आणि स्थानिक नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने पुनर्वसन करणे शक्‍य होणार नसल्याने वाहतुकीला होणारा अडथळा विचार घेऊन कारवाई करण्याचा अभिप्राय प्रशासनाने दिला आहे.

पथ विक्रेता अधिनियम 2014 हे केंद्र सरकारचे धोरण पुणे महापालिकेला लागू झाले आहे. त्यामधील तरतुदीनुसार राज्य शासनाने पथ विक्रेता योजना 2017 हे धोरण ठरविले. या दोन्ही धोरणांची अंमलबजावणी महापालिका स्तरावर सुरू असून त्यांतर्गत शहरातील रस्ते आणि पदपथांवरील फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्यांची संगणकीय नोंदणी करण्यात आली आहे. एकूण 28,252 फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. 21 हजार 32 फेरीवाल्यांची संगणकीय नोंदणी झाली आहे. 20 हजार 685 फेरीवाल्यांना त्यांचे व्यवसाय प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. उर्वरीतांना कागदपत्रे न दिल्यामुळे किंवा व्यवसाय करत नसल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र वाटण्यात आले नाहीत.

6,662 फेरीवाल्यांचे 420 ठिकाणी होणार पुनर्वसन
शहरातील एकूण 21 हजार 32 नोंदणीकृत फेरीवाल्यांपैकी अ, ब, क वर्गवारीतील 9,411 तसेच “ड’ आणि “ई’ वर्गवारीतील 11,151 व्यावसायिक आढळून आले आहेत. पहिल्या टप्प्यात पहिल्या तीन वर्गवारीतील व्यावसायिकांचे पुनर्वसन मान्य झालेल्या 420 पुनर्वसन हॉकर्स झोनमध्ये करण्यासाठी तसेच “ड’ आणि “ई’ वर्गवारीतील व्यावसायिकांच्या जागा शिल्लक राहिल्यास दुसऱ्या टप्प्यात पुनर्वसन करण्याचे ठरवण्यात आले आहे. या बाबींना प्रभाग समिती आणि शहर फेरीवाला समिती यांची मान्यता घेवून मुख्यसभेच्या अन्वये उपसूचनेनुसार मान्यता देण्यात आलेल्या महापौरांच्या अध्यक्षतेखालील पक्षनेत्यांच्या बैठकीत वेळोवेळी मान्यता घेण्यात आली आहे. सद्यस्थितीत शहरातील 6,662 फेरीवाल्यांचे 420 ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. उर्वरीत फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाची कार्यवाही सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी बांधण्यात आलेल्या ओटा मार्केटमध्ये कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)