अनधिकृत फलकांमुळे अपघाताचा धोका

पिंपरी – शहरातील चौका-चौकात अनधिकृत फलकांचे प्रमाण वाढत असल्याने विद्रुपीकरण वाढले आहे. फलक धोकादायक स्थितीत लावले जात असल्याने अपघात होण्याची शक्‍यता आहे. यामुळे, शहरातील अनधिकृत फलकांवर कारवाई करण्याची मागणी, नागरिकांनी केली आहे.

शहरात अनेक ठिकाणी वाढदिवस, लग्न सोहळे, उद्‌घाटन समारंभ यासारखे असंख्य फलक लावलेले दिसत आहेत. याची महापालिकेच्या संबधित विभागाकडून कोणतीही परवानगी घेतली जात नाही. शहरातील बहुतांशी फलक राजकीय पुढाऱ्याचे असल्याचे दिसून आले आहे. तसेच, अनेक फलक लावणारे महाशय महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत “अर्थाजन’ करत असल्याची चर्चा आहे. यामुळे, शहरातील अनधिकृत फलकांवर कारवाई केली जात नाही. धोकादायक फलकांमुळे एखादा अपघात घडल्यास जबाबदार कोण? असाही प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या तीन महिन्यापूर्वी पुणे शहरात अनधिकृत फलक पडून नागरिकांचा मृत्यू झालेला होता. यानंतर, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत फलकांवर कारवाईचा धडाका सुरु केला होता. याचबरोबर, कोणतेही फलक लावण्यासाठी परवानगी द्यायची नाही असा पवित्रा महापालिकेने घेतला होता. मात्र, सध्याची स्थिती पाहता शहरात सरार्सपणे फलक लावले जात आहेत. तसेच, अनधिकृत फलकांवरील कारवाई थंडावली असल्याचे दिसून आले आहे.

“”शहरात अनेक ठिकाणी धोकादायक फलक उभारले आहेत. काही ठिकाणी इलेक्‍ट्रिक खांबाजवळ फलक लावले जात असल्याने दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे. महापालिकेने अनधिकृत फलक लावण्यास बंदी घालूनही फलक लावले जात असल्याने कडक कारवाई करणे आवश्‍यक असल्याचे, श्‍याम विभुते यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)