अनधिकृत पार्किंग केल्यास लागणार “जॅमर’

  • राजगुरूनगरात पोलीस करणार करवाई : रोटरी क्‍लबच्यावतीने जॅमर भेट

राजगुरूनगर – शहरात होत असलेल्या वाहतूक कोंडी आणि वाहनचालकांचा बेशिस्तपणा यामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठ्या अडचणी निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणून शहरात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनांवर खेड पोलीस कारवाई करणार असून त्यासाठी आवश्‍यक असलेले जामर रोटरी क्‍लब ऑफ राजगुरूनगर यांच्यावतीने खेड पोलिसांना नुकतेच देण्यात आले.
या प्रसंगी रोटरी क्‍लबचे अधक्ष्य प्रवीण वाईकर, अधक्ष्य गणेश घुमटकर, पोलीस उपाधीक्षक राम पठारे, पोलीस निरीक्षक प्रदिप जाधव, रोटरीचे माजी अध्यक्ष अविनाश कहाणे, बाळासाहेब सांडभोर, राहुल वाळुंज, पावन कासव, राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे संचालक राहुल शेठ तांबे पाटील उपस्थित होते.
राजगुरुनगर शहरातील अंतर्गत रस्ते आणि शिरूर राजगुरुनगर-वाडा मार्गे भीमाशंकरकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात दुचाकी चारचाकी वाहने पार्किंग केली जात आहेत, त्यामुळे याठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. ती सोडविण्यासाठी नगरपरिषद आणि खेड पोलिसांच्या माध्यमातून संयुक्त कारवाई केली जाणार आहे. शहरातील अरुंद रस्ते, दुकाने यांच्या जवळच अनेक दुचाकी पार्किंग आहे. याबरोबरच वाडा रस्त्यावर शिरूर भीमाशंकर राज्य मार्गावर रस्त्याजवळ वाहने पार्किंग केली जातात. वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. याबाबत राजगुरुनगर नागरिकांनी अनेकदा याबाबत आवाज उठवला मात्र, पोलीस प्रशासन अपुऱ्या पोलीस बळामुळे ही कारवाई करीत नव्हते. यासाठी रोटरी क्‍लब ऑफ राजगुरूनगरने पुढाकार घेत या कामाला गती येण्यासाठी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी थेट कारवाई सुरु केली जाणार असून त्यासाठी आवश्‍यक असलेल्या जामरची सोय रोटरी क्‍लबने सुरु केली आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना सुधीर मांदळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अविनाश कोहीनकर तर गणेश घुमटकर यांनी आभार मानले

रोटरीने दिलेल्या जामरचा निश्‍चित आमचे पोलीस ठाणे उपयोग करतील. लवकरच शहरातील अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल. राजगुरुनगर शहरात वाहतूक कोंडी होणार नाही याकडे जास्त लक्ष देण्यात आले आहे. रस्त्यात वाहने पार्किंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
-राम पठरे, पोलीस उपअधीक्षक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)