“अनधिकृत पार्किंग’विरोधात कारवाईचा बडगा

पिंपरी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व महापालिका इमारती समोरील अनधिकृतपणे उभ्या असलेल्या चार चाकी वाहनांवर पिंपरी वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात आली. अनधिकृत वाहनांमुळे शहरात सतत वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. वाहन चालकांकडून तीन हजार दंड वसूल केला.

पिंपरीतील महापालिका इमारतीसमोर मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जातात. यामुळे, जुना मुंबई-पुणे महामार्ग व अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच, आंबेडकर चौकात अनधिकृतपणे रिक्षा उभ्या राहत असल्याने सतत अपघात होतात. महापालिका इमारतीबाहेर महापालिकेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी वाहने लावत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे, पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो.

-Ads-

वाहतूक विभागाने बेशिस्त वाहतूकीवर आळा बसण्यासाठी कारवाईची मोहीम सुरु केली आहे. पिंपरी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या परिसरात शाळा, महाविद्यालय व विविध कार्यालये असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. या ठिकाणी अनेक खासगी वाहनचालक बेशिस्तपणे वाहने लावतात. यामुळे, मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो. बेशिस्तपणे वाहने लावल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. चौकात वाहतूक पोलिसांनी अनधिकृत रिक्षा चालकांवरही कारवाई करणे गरजेचे आहे. यामुळे, परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास निश्‍चितपणे मदत होईल,अशी भूमिका अनेक नागरिकांनी “प्रभात’शी बोलताना मांडली.

शहरात अनधिकृतपणे वाहने लावली जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीला अडथळा होत आहे. यामुळे, कारवाईची मोहीम सुरु केली आहे. वाहन चालकांनी नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
– संतोष पाटील, सहाय्यक वाहतूक पोलीस निरीक्षक, पिंपरी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)