अनधिकृत पथारीधारकांवर धडक कारवाई

पिंपरी – महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने अनधिकृत पथारीधारकांवर धडक कारवाई करण्यात आली.

यामध्ये “अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने यमुनानगर येथे पदपथावरील कारवाईमध्ये तीन हातगाड्या, दोन लोखंडी टपऱ्या, “क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत चिखली-कुदळवाडी रस्त्यालगतच्या पदपथावरील कारवाईमध्ये तीन व चारचाकी वाहनांचे 65 टायर, चार टायर डिस्क, तीन हातगाड्या एक लोखंडी टपरी, चार लाकडी बाकडे, तीन खुर्च्या, दोन प्लास्टिक टेबल, आठ प्लास्टिक कॅरेट जप्त करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याशिवाय “ह’ व “ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने पिंपळे गुरव सांगवी परिसरातील साई चौक ते फेमस चौकातील कारवाईमध्ये नऊ हातगाड्या, एक जाहिरात फलक, दोन पान टपऱ्या, एक लोखंडी वजन काटा, 11 लोखंडी टेबल, जाळी, स्टूल व इतर लोखंडी साहित्यासह एक लोखंडी टपरी, चार लाकडी बाकडे, तीन खुर्च्या, दोन प्लास्टिक टेबल, आठ प्लास्टिक कॅरेट जप्त करण्यात आले. महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कर्मचारी, क्रेन, डम्पर, जे. सी. बी.च्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)