अनधिकृत जाहिरातबाजी; दुकानदारांविरोधात गुन्हे

संग्रहित छायाचित्र

मोबाइल कंपन्यांची जाहिरात करणे आले अंगलट

पुणे- महापालिकेची आकाशचिन्ह आणि परवाना नियमावली पायदळी तुडवत मोबाइल दुकानांच्या बाहेर अनधिकृतपणे जाहिरातबाजी करणाऱ्या दुकानचालकांविरोधात महापालिकेने पोलिसांत तक्रार केली होती. त्यानुसार मंगळवारी यातील काही दुकानदारांविरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जय मल्हार शॉपचे मालक स्वप्नील जयराम कवडे (रा. बालाजीनगर, घोरपडी), बालाजी सेल्स ऍन्ड सर्व्हिस शॉप नंबर 3, पिंगळे वस्ती, मुंढवा या शॉपचे चालक महेंद्र अशोकलाल मुनोत (39, रा. पिंगळे वस्ती, मुंढवा) तसेच स्वप्नील मोबाइल शॉप (बी.टी. कवडे रोड, घोरपडी) यांच्यावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 244, 245 व जाहीरात व नियंत्रण अधिनियम 2003 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिका विभागातील परवाना निरीक्षक संतोष बाबू कुंभार (45, रा. बुधवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तिन्ही दुकानदारांच्या विरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानांसमोर सॅमसंग, ओप्पो आणि विवो तिन्ही कंपन्यांच्या जाहीराती नियमांचे उल्लंघन करत जाहिराती लावण्यात आल्या होत्या. महापालिकेची मान्यता न घेता शहरात जाहिराती लावल्या जातात. यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत असून जाहिरातींमुळे उच्च्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत आहे. यामुळे या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार मुंढवा पोलीस ठाण्याकडे करण्यात आली होती. या प्रकरणी अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

काय आहेत जाहिरातींचे नियम
शहरातील जाहिरातींसाठी आकाशचिन्ह आणि परवाना धोरण-2003 आहे. त्याला राज्यशासनाचीही मान्यता आहे. यानुसार जाहिरात करण्यास प्रति चौरस फूट 222 रुपये शुल्क आकारून मान्यता दिली जाते. या धोरणातील तरतुदीनुसार, दुकानदारांना आपल्या व्यवसायाची जाहिरात योग्य पध्दतीने करता यावी, यासाठी दुकानाच्या दर्शनी भागाच्या लांबीएवढी आणि 3 फूट उंचीची जाहिरात लावण्यास मुभा दिली जाते. मात्र, त्यासाठीही आकाशचिन्ह विभागाची परवानगी आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)