अनधिकृत जाहिरातप्रकरणी 70 लाखांचे शुल्क

ऍमेनोरा, सिझन मॉलला शुल्क भरण्याची पालिकेची नोटीस 

पुणे – अनधिकृत जाहिराती लावल्याप्रकरणी महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने सिझन मॉल आणि ऍमेनोरा सिटी मॉलवर मागील आठवड्यात कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, मॉलने उभारलेल्या जाहिरातींचे मोजमाप आकाशचिन्ह विभागाने पूर्ण केले असून या जाहिरातींपोटी तब्बल 70 लाखांचे शुल्क महापालिकेस भरण्याच्या नोटीस या दोन्ही मॉलला दिल्याची माहिती आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांनी दिली.

शहरातील मॉलधारकांना त्यांच्या दर्शनिय भागात 3 फूट उंचीची तसेच दर्शनिय भागाच्या लांबीएवढी जाहिरात मोफत करता येते. मात्र, जवळपास सर्वच मॉलचालकांनी या नियमांचे उल्लंघन करत अनेक मोठ्या जाहिराती लावल्या आहेत. यासाठी प्रत्यक्षात महापालिकेस प्रतिचौरस फूट 222 रूपये भरून या नियमावलीनुसार, मान्यता घेणे आवश्‍यक आहे. मात्र, मॉलचालकांनी महापालिकेच्या नोटीसला केराची टोपली दाखविण्यात येत होती. अखेर प्रशासनाने मॉलवर मागील आठवड्यात कारवाई सुरू केली आहे.

त्यानुसार, हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नेमलेल्या भरारी पथकाने सिझन मॉल आणि ऍमेनोरा सिटीतील मॉलबाहेरील अनधिकृत जाहिराती हटविल्या. त्यानंतर या दोन्ही मॉलने उभारलेल्या जाहिरातींच्या आकाराचे मोजमाप सुरू करण्यात आले होते. अखेर या दोन्ही मॉलची जाहीरात शुल्काची रक्कम निश्‍चित करण्यात आली असून सिझन मॉलला 36 लाख तर ऍमेनोरा मॉलला 34 लाख रूपये जाहीरात शुल्क भरण्याची नोटीस बजाविल्याचे दौंडकर यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)