अनधिकृत केबलसाठी “अभय योजना’

शहर सुधारणा समितीच्या प्रशासनाला सूचना : केबलसाठी स्वतंत्र धोरण तयार
पुणे : शहरात अनेक खासगी मोबाईल कंपन्यांनी अनधिकृतपणे केबल डक्‍ट टाकलेले आहेत. हे डक्‍ट अधिकृत केल्यास त्यातून महापालिकेस उत्पन्न मिळेल तसेच नक्की किती कंपन्यांनी अनधिकृत डक्‍ट टाकले आहेत. याची माहिती समोर येईल, त्यामुळे ज्या प्रमाणे मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना आणण्यात आली होती. त्याच धर्तीवर या केबलसाठीही धोरण तयार करण्यात यावे, अशा सूचना शहर सुधारणा समितीने महापालिका प्रशासनास दिल्या असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. समिती सदस्य ऍड. भैय्यासाहेब जाधव यावेळी उपस्थित होते.

मेंगडे म्हणाले, गेल्या काही वर्षांत महापालिकेकडून केबलसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. मात्र, त्या पूर्वी तसेच सध्याही शहरात अनेक कंपन्यांकडून बेकायदेशीपणे खोदाई करून केबल टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचे कोणतेही शुल्क महापालिकेस मिळालेले नाही, तसेच जमिनीखाली कोणती केबल अधिकृत आणि कोणती अनधिकृत हे निश्‍चित करणे अवघड आहे. त्यामुळे महापालिकेस आर्थिक फटकाही बसत आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने या केबल डक्‍टसाठी अभय योजना आणल्यास महापालिकेस उत्पन्न मिळणे शक्‍य असल्याचे मेंगडे म्हणाले.

-Ads-

या केबल अधिकृत करताना, कंपन्यांना ठराविक कालावधी देऊन तसेच काही सवलत देऊन त्यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार, शुल्क आकारून मान्यता दिल्यास या कंपन्या पालिकेकडे नोंदणी होतील. तसेच भविष्यात या कंपन्यांनी अनधिकृत केबल डक्‍ट टाकल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करता येईल अशा प्रकारच्या तरतूदी या प्रस्तावात असाव्यात अशा सूचनाही या बैठकीत करण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)