अनंत गीते हे ‘अवजड मंत्री आहेत की अवघड मंत्री’ ? – अजित पवार

रायगड: महाड येथे चवदार तळ्याचे घेऊन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवर्चन यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ झाला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप-शिवसेना सरकारवर हल्लाबोल केला.

रायगड मध्ये पहिल्या सभेलाच प्रचंड गर्दी झाली आहे. लोकांचा असंतोषच यातून दिसत आहे, आता थांबायचे नाही. आता मागे पाहायचे नाही, परिवर्तन घडवायचेच, अशी गर्जना विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. राष्ट्रीय भाजप सरकारने इतके वर्षे फक्त लोकांची फसवणूक केली. या भागातील मंत्री अनंत गीते हे ‘अवजड मंत्री आहेत की अवघड मंत्री’ काहीच कळत नाही. एक कारखाना त्यांनी इथे आणला नाही, इथले रस्ते नीट नाही, याउलट राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी नेहमीच या भागाचा विचार केला आहे, असे पवार म्हणाले.

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात की देशात चोरांचं सरकार आहे, सरकारमधील लोक नालायक आहेत, मग जे शिवसेनेचे मंत्री सत्ता उपभोगत आहे ते कोण आहेत? असा सवाल पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात जी विकासकामे केली त्याला नेस्तनाबूत करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. रायगडचे खासदार अनंत गितेंनी या परिसरात काहीच काम केले नाही. गितेंनी रायगडवासियांची फसवणूक केली आहे, अशी टीका देखील तटकरे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)