अनंता ढवळे यांची सांगिसे बुधवडी उपसरपंचपदी निवड

कामशेत, (वार्ताहर) – सांगिसे-बुधवडी ग्रुपग्रामपंचायत उपसरपंचपदी अनंता मारुती ढवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

काही महिन्यांतच ग्रुप ग्रामपंचायत सांगिसे पहिल्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपत असून, उपसरपंच सुभाष गबळू भांगरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुशिला विठ्‌ल सुतार यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक जी. पी. सानप यांच्या उपस्थितीत निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेत अनंता ढवळे यांचा एकमेव अर्ज आल्याने सरंपच व ग्रामसेवक यांनी ढवळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर केली.
या वेळी सरंपच सुशिला सुतार, माजी उपसरपंच सुभाष भांगरे, माजी सरपंच सारिका शिंदे, मंदा कालेकर, सुरेखा गरुड, सदस्य महेश दळवी यांनी अनंता ढवळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या वेळी रामभाऊ कालेकर, गोरख बांगर, गुलाबराव तिकोणे, संपत गरुड, संभाजी गरुड सदाशिव गरुड, पंकज भांगरे, संतोष भानुसघरे, निखील वावरे, नवनाथ ढवळे यांच्यासह सांगिसे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)