श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमधील अनंतनाग येथे पोलीस आणि दहशवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक दहशतवादाच्या खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. तर या कारवाईत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या दहशतवाद्याची ओळख पटवण्यात आलेली नाही. जखमी पोलिसाला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोध मोहिम राबवण्यात येते आहे. याप्रसंगी दहशतवाद्यांनी पोलीस चौकीवर हल्ला केला. या हल्ला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यात एक दहशतवादी ठार झाला असून एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या कारवाईनंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून अन्य दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिका-यांनी दिली.

यापूर्वी 1 सप्टेंबरलाही बंदिपुरा सेक्‍टरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. शनिवारी म्हणजेच 1 सप्टेंबरला झालेल्या कारवाईत पोलिसांनी दहशतवाद्यांकडे असलेली शस्त्रास्त्रे, दारूगोळा जप्त केला होता. किलो फोर्स या भारतीय जवानांच्या तुकडीचाही या कारवाईत समावेश होता. या कारवाईत दोन जवान जखमी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)