अध्यापक महाविद्यालयाच्या बाप्पाची रथातून मिरवणूक

वडगाव मावळ, (वार्ताहर) – श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य व अध्यापक महाविद्यालयाच्या श्री गणपती बाप्पाचे रथातून ढोल-ताशाच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात पाचव्या दिवशी मंगळवार दि. 29 ला विसर्जन झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृतीच्या घोषणा दिल्या.

“गणपती बाप्पा मोरया-पुढच्या वर्षी लवकर’ या अशा विद्यार्थ्यांनी घोषणा देत वाद्यांच्या तालावर नृत्य केले. मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराजवळील तलावात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. उपस्थितांना प्रसादाचे वाटप झाले. यावेळी प्राचार्य डॉ. सुधाकर साळी, डॉ. रवींद्र मिस्तरी, हिरामण लंघे, प्रा. महादेव वाघमारे, प्रा. अशोक गायकवाड, प्रा. महादेव सांगळे, प्रा. संदीप गाडेकर, प्रा. अनिल कोद्रे, प्रा. सुधीर ढोरे, प्रा. शीतल ढोरे, प्रा. रोहानी चंदनशिवे, प्रा. राजेंद्र डोके, प्रा. मनोज गायकवाड, प्रा. सुरेश घोजगे, मोहन कडू व विद्यार्थी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)