अध्यात्म, शिक्षणातून समाज उन्नती

सुशीलकुमार शिंदे : नाणेगाव शाळेच्या इमारतीचे लोकार्पण

पौड- शिक्षणाची सुरुवात ही मुळातच अध्यात्मापासून व्हायला पाहिजे. हीच शिकवण देत महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी स्वतःचा संसार-प्रपंच करून श्री समर्थ बैठक शिकवणीतून सक्षम समाज उभा करून राष्ट्राकरिता मोठे कार्य केले असून ते अखंडपणे सुरू आहे. अध्यात्म आणि शिक्षण ही मोठी ताकद असून समाज उन्नतीसाठी त्याचा उपयोग होत आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
नाणेगाव (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या तैलचित्राचे अनावरण आणि ब्रिटन्स कार्पेट कंपनीच्या सीएसआर फंडातून नाणेगाव येथील जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारतेचे लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी शिंदे बोलत होते. याप्रसंगी डिजिटल ई-लर्निंग शैक्षणिक संचही भेट देण्यात आला. तसेच गावातील माजी विद्यार्थी व ग्रामस्थांच्या आर्थिक सहकाऱ्याने शाळेसाठी संरक्षण भिंतही उभारण्यात आली. याचे उद्‌घाटनही शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ज्येष्ठ साहित्यिक विलास पाटील, सिंबोयसिसचे अध्यक्ष शां. ब. मुजुमदार, ब्रिटन्स कार्पेट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश बसन्नवार, सतीश करंजकर, उद्योजक विजय लोढा, सचिन निम्हण, रामचंद्र ठोंबरे, बबनराव दगडे, सुभाष अमराळे, शांताराम इंगवले, शंकर मांडेकर, बाळासाहेब चांदरे, लक्ष्मीबाई सातपुते, कोमल वाशिवले, सुरेश हुलावळे, सुनील चांदेरे, सरपंच कौसल्या गायकवाड, उपसरपंच वसंत लाखवडे, यांचबरोबर धर्माधिकारी परिवारातील सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन यशवंत गायकवाड यांनी केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)