अध्यात्मिक ग्रंथाने बदलले आयुष्य

मनिषा संदीप

मागील आठवड्यात “अस्मिता’च्या याच पानावर, वि. स. खांडेकर यांच्या “ययाती’ या कादंबरीवर माझा अभिप्राय प्रसिद्ध झाला होता.. अगदी भरभरून… मोठ्या मनाने आपल्या मराठी रसिक वाचकांनी त्याला प्रतिसाद दिला… “ययाती’ ही प्रेमरसाने भरलेली कादंबरी आणि त्याचे दुसरे टोक म्हणजे हे… श्री दत्तगुरुंचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत याबद्दल माझा अभिप्राय तुम्हाला सांगणार आहे…

श्रीपाद वल्लभांनी पीठीकापुरम येथे अप्पलराज शर्मा आणि महाराणी सुमती यांच्या उदरी जन्म घेतला अर्थात लोकल्याणासाठी… त्यांना तीन बहिणी आणि दोन भाऊ होते… श्रीधरराज शर्मा आणि रामराज शर्मा एक अंध तर एक पायाने अपंग… सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करणारे श्रीपाद एका वाघाच्या कातड्यावर (व्याघ्राजिन ) का बसले असतील त्याचीही सुंदर कथा आहे. आपल्या दुःखाची काय कारणे आहेत हे खरं तर या ग्रंथामुळे कळते… स्वामींच्या लीला वाचताना कुठेही अंधश्रद्धा वाटत नाही… स्वामींनी भक्‍तांना बारा अभय वचनं दिली आहेत. ते वाचून तर प्रत्यक्ष दत्तगुरू आपल्याकडे त्यांच्या त्या अमृतमय दृष्टीने सुख, शांती, ऐश्‍वर्याची जणू वृष्टीचं करत आहेत असे वाटते….

मग एका मागे एक सुंदर कथा आणि प्रत्येक वेळी पुढे काय असेल या उत्सुकतेमुळे पुस्तक हातातून खालीच ठेवावेसे वाटेना. अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे लिखाण इतके सहज आणि सोपे आहे की वाचताना खूप गोडी निर्माण होते थोडक्‍यात यातील कथा रहस्य कथेसारख्या उत्सुकता वाढवत जातात… हा सुंदर ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभांचे समकालीन असलेल्या शंकरभट्ट यांनी संस्कृत भाषेत लिहिला. त्यानंतर त्याचे अनेक भाषेमध्ये रूपांतरण झाले.

प्रत्येक जातीधर्मामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारची माणसे असतात एखाद्याचे चांगलेपण किंवा वाईट पण हे त्या व्यक्‍तीच्या विचारांवर अवलंबून असते…जातीवर नाही…स्वामींना ही जातीभेद करणाऱ्यांचा किती तिटकारा होता हे ही या ग्रंथामधून आपणास कळेलच…. तरुण तरुणींनी, लहानांनी, मोठ्यांनी व सगळ्यांनी वाचावा असा ग्रंथ आहे. तो वाचल्याने ज्ञानात भर पडते असे समजून किंवा कथा समजून तुम्ही वाचली तरी हरकत नाही…हा ग्रंथ वाचल्यानंतर काही दिवस तरी मनातून जात नाही… निदान माझ्या तरी तो गेला नाही….


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)