अध्यक्ष सिरीसेना यांनी श्रीलंकेला आर्थिक संकटात ढकलले 

बडतर्फ अर्थमंत्री मंगला समरवीरा यांचा दावा 

कोलंबो – श्रीलंकेचे अध्यक्ष सिरीसेना यांनी रानील विक्रमसिंघे यांचे सरकार बेकायदेशीरित्या बडतर्फ करून देशात जी राजकीय अनागोंदी माजवली आहे त्यामुळे देशालाही त्याची मोठी िंकंमत मोजावी लागली आहे. देशाची अर्थव्यवस्था पुर्णपणे मोडकळीला आली असून त्याला अध्यक्ष सिरीसेना यांचा बेजबाबदारपणाच कारणीभूत आहे असा आरोप बडतर्फ अर्थमंत्री मंगला समरवीरा यांनी केला आहे.

गेल्या 26 ऑक्‍टोबर रोजी अध्यक्षांनी लोकनियुक्त सरकार अचानक बरखास्त केले. त्यामुळे देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळे या मधल्या काळात देशापुढे जी आर्थिक आव्हाने निर्माण झाली होती त्यावर तातडीने कृती करता आली नाही त्यामुळे आर्थिक प्रश्‍न गंभीर बनत गेले. देशापुढे सध्या आर्थिक अनागोंदीची जी स्थिती निर्माण झाली आहे त्याला सर्वस्वी अध्यक्षच जबाबदार आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

श्रीलंकेत इतकी बिकट आर्थिक स्थिती यापुर्वी कधीच नव्हती असे ते म्हणाले. श्रीलंकेच्या घटनेनुसार संसदच आर्थिक विषयावर व सार्वजनिक खर्चाच्या बाबींविषयी निर्णय घेऊ शकते पण येथे संसदच निलंबीत केली गेली त्यामुळे बिकट प्रश्‍न निर्माण झाले. ते आता कोण निस्तरणार असा सवालही त्यांनी केला. आता 1 जानेवारी 2019 पर्यंत नवीन संसद अस्तित्वात नसेल. अशा वेळी आर्थिक बाबतीत निर्णय कोण घेणार असा सवालही त्यांनी केला. सरकारी नोकरांना पगार देणे, निवृत्तीवेतन देणे या साठी जो पैसा लागतो तो उपलब्ध होणेही अवघड बनले आहे कारण ते मंजुर करण्याचे अधिकार आता कोणाकडेच नाहीत असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)