अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव कायमच – विखेपाटील

File Photo

मुंबई – सत्ताधारी पक्षानेच सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याची नवीन प्रथा सुरु करुन, स्वतःचे अपयश झाकण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे. भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेवर कोणतीही चर्चा सभागृहात सरकारला होऊ द्यायची नसल्यामुळेच सत्ताधारी पक्षांनी सभागृह बंद पाडून संसदीय परंपरा आणि प्रथांना काळीमा फासला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.

विरोधी पक्षाची चर्चेची तयारी असतानाही सरकार पक्षाने सभागृहातून पळ काढणे म्हणजे स्वतःचे अपयश झाकण्याचाच प्रकार आहे. यापूर्वी अशी घटना कधीही घडली नव्हती याकडे त्यांनी लक्ष वेधले. कायदा, सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराबाबतची चर्चा सरकारला होऊच द्यायची नव्हती यामुळेच सभागृहातील कामकाज सत्ताधारी पक्षानी जाणीवपूर्वक बंद पाडले असले तरी अध्यक्षांविरोधात आम्ही दाखल केलेला अविश्वास ठराव अजूनही कायम असून सोमवारी हा ठराव कार्यक्रम पत्रिकेवर घ्यावा अशी मागणी विधानसभा सचिवांकडे आम्ही केली असल्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)