निमसाखर- येथील निमसाखर एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूल सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी लहु पांडुरंग दरेकर यांनी बिनविरोध निवड झाली. येथील सेवक सहकारी पतसंस्थाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या प्रक्रियेत नऊ संचालकांची बिनविरोध निवड झाली. गेल्या काही दिवसांपूर्वी इंदापूर येथे पतसंस्थेच्या अध्यक्षपदासाठी प्रक्रिया पार पडली. यामध्ये अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आल्याने लहु दरेकर यांची बिनविरोधक निवड झाली. यावेळी सहकारी साहेबराव कारंडे यांच्या हस्ते दरेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे सचिव दत्तात्रय ढोबळे, चंद्रकात बोंद्रे , सुर्यकांत किसवे, बाळासाहेब रणवरे, बरकत डांगे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)