अनावश्‍यक गोष्टींत वेळ घालवू नका – पवार

सोमेश्‍वरनगर – माणसाने आपल्या जीवनात थोडा का होईना वेळ व्यायाम करण्यात घालविल्यास आपले शरीर निरोगी राहील व आरोग्यदायी जगणे मिळू शकते. विनाकारण अनावश्‍यक गोष्टीत वेळ घालवू नये, असे मत बारामतीचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर पवार यांनी व्यक्‍त केले. वाघळवाडी (ता. बारामती) येथे उत्कर्ष आश्रमशाळेच्या सभागृहात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांसाठी पंचायत समितीचा शिक्षण विभाग व शांतीलाल मुथा फाऊंडेशनच्या वतीने नुकतीच तीनदिवसीय मुल्यवर्धन कार्यशाळा झाली त्यांच्या समारोपप्रसंगी पवार बोलत होते. याप्रसंगी अनिल जगदाळे, संजय गायकवाड, सतिश कुदळे, केशव जाधव, बाळासाहेब मारणे, नंदकुमार होळकर, रमेश भोसले आदी उपस्थित होते. याप्रसंगी बापूराव गायकवाड, सचिन सरवदे, सुहास माने, मंगल आगवणे, इंदूमती विरकर, धनंजय मदने यांनी प्रेरक म्हणून जबाबदारी पार पाडली. यावेळी ऊसतोडणी मजूरांच्या स्थलांतरीत मुलांना नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केल्याचे काम केल्याबद्दल अशा प्रकल्पाचे परेश मनोहर, राजू बालगुडे यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषद शिक्षिकाद्वारका काळभोर यांनी आश्रमशाळा व साखरशाळा या मुलांना टुथब्रश व दप्तर दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
वाघळवाडी (ता. बारामती) : येथील प्रेरक बापूराव गायकवाड यांचा सत्कार करताना गटविकास अधिकारी किशोर पवार यांच्या हस्ते करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)