अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यालाही – सुभाष देसाई

मुंबई – अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याला उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाणार येथील भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यासंदर्भात पत्र दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले, नाणार येथील जनतेचा विरोध लक्षात घेऊनच आपण अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केली.

कायद्याला अनुसरूनच आपण हा निर्णय घेतला असून भूसंपादन कायद्यातील कलम 3 प्रमाणे मंत्र्यालाही अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार आहे. यासंदर्भात सचिवांना बोलावून पत्र दिले आहे. त्यांना त्याबाबत प्रस्ताव तयार करण्यास सांगितले असून ते लवकरच प्रस्ताव सादर करतील, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)