अधिक मास की अधिक त्रास? 

– धनंजय 

स्थळ – मुंबईपासून हाकेच्या अंतरावर; वेळ – स्वबळ चाचपणीची 
राजा विक्रमने सभा गुंडाळली व महालाच्या दिशेने निघाला. स्वबळाचा नारा दिल्यापासून जरा जास्तच जंगल तुडवावी लागतं आहेत, असा निगेटिव्ह विचार मनात आला व राजा विक्रमाच्या कपाळी धर्मबिंदू जमा झाले. “छे छे आता तर सुरुवात आहे, आतापासूनच असा नकारात्मक विचार करून कसे चालेल?’ असा मनाशीच निग्रह करत राजाने मान झटकत विचार झटकून टाकला व पावलांचा वेग वाढवला. इतक्‍यात गडगडाटी हास्य करीत वेताळ प्रकट झाला व राजाच्या मानगुटीवर जाऊन बसला. तसे विक्रमाने तलवारीस हात घातला व क्रोधाने म्हणाला ‘वेताळा, दूर हो. आता मला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही, एकला चालो रे, स्वबळाचा नारा बुलंद केला आहे मी.’

‘राजा, हे तू मला सांगतो आहेस की स्वतःला बजावतो आहेस, स्वबळ स्वबळ म्हणून? अरे अगोदरच तुमच्या सरदाराने भूमिका घेतली आहे मित्र तोडायची. राजा, स्पष्ट भूमिका घे राजा.’
‘वेताळा, आमचे स्वबळ आणि तीव्र विरोध. तुला संशय का येतो आमच्या वागण्यावर?’
‘राजा, नुसतीच शंका नाही, स्वबळ हा तुझा कल्पना विलास आहे तुझा नवा डाव आहे समोरच्यावर हावी होण्यासाठी.’
‘राजा, खरं सांग. परवा कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रिपदासाठी शपथविधी झाला. झाडून सारे मोदीविरोधक जमले होते. तुलाही आमंत्रण होते अशी पक्की माहिती आहे, मग तू का नाही गेलास?’
‘वेताळा, अरे इथे पोटनिवडणुका होत्या. त्याचा प्रचार करावा लागतो. पोटनिवडणुका या पोटापाण्यासाठी आवश्‍यक असतात रे. दुसरे म्हणजे मी वाघ आहे. तू वाघाला कधी कळपात बघितलेस का? मग कुमारस्वामी यांच्या कळपात मी दिसेल असे तुला वाटलेच कसे?’

‘एवढेच राजा? की अजून काही ?’
‘वेताळा, आजवर उत्तर प्रदेशातून बेरोजगाराचे लोंढे येत. काल परवा मुख्यमंत्री आले होते उत्तर प्रदेशचे. इथले मुख्यमंत्री बेरोजगार होऊ नये म्हणुन. त्यात अधिकमास आला आहे वेताळा, त्यांची खातीरदारी नको करायला?’
‘पण ते तर संन्यासी आहेत, खातीरदारी जावयाची करतात राजा.’
‘अर्थातच वेताळा, शपथविधीला कर्नाटकात गेलो असतो तर आमचा पत्ता कट झाला असता. उलट आम्ही केवळ वरवर आलोचना करतो व आतून अजूनही एनडीएचेच आहोत, हे दर्शवल्यामुळे आम्हाला यंदा जावयाचा मान मिळण्याचा योग आहे, व अधिकमासाच्या अधिक जागा पण… कारण यांचे सारे मित्र दुरावले आहेत व युपीएला जॉईन होत आहेत, यांचे मित्र आता कोण तर ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन, तेव्हा आमचा भाव वधारणार यंदा अधिकमास निमित्ताने वेताळा!’
‘अभिनंदन राजा, आणि बोलण्याच्या ओघात तूच कबुलीजबाब दिल्याबद्दल धन्यवाद आणि शेवटी अधिकमासाच्या शुभेच्छा! स्वबळ विजयी भव…!’
गडगडाटी हास्य करीत वेताळ अदृश्‍य होतो, राजा थिजल्यासारखा उभा राहतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)