चिंबळी- निघोजे (ता. खेड) येथे अधिक मासनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला असून हा सोहळा बुधवार (दि. 30) पर्यंत सुरु रहणार आहे. यानिमित्त भैरवनाथ महाराजांच्या मंदिरासमोर मंडप उभारण्यात आला असून त्यात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वर पारायण सोहळा सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त रोज सकाळी काकड आरती व सकाळी 7 ते 12 ज्ञानेश्‍वरी पारायण दुपारी 12 ते 1 गाथा भजन, 1 ते 4 महिला भजन, 4 ते 5 अधिकमास महात्म्य, 5 ते 6 हरिपाठ, 7 ते 9 किर्तन सेवा व रात्री 10 ते 12 हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसर भक्‍तीमय झाला आहे. यामध्ये हभप बापूसाहेब मोरे, सोपान सानप, प्रकाश साठे, मुकुंद चौधरी, ज्ञानेश्‍वर राऊत, जयवंत बोधले, संदिपान शिंदे या महाराजांची किर्तनसेवा होत आहे. बुधवारी (दि. 30) सकाळी 10 ते 12 हभप पांडुरंग महाराज गिरी (नाशिक) यांची किर्तन सेवा तर महाप्रसादानाने या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)