अधिक ज्येष्ठनिमित्त श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या दर्शनाला गर्दी

नायगाव- श्री क्षेत्र नायगाव (ता. पुरंदर) येथे अधिक ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी श्री सिद्धेश्वर महाराज आणि माता जोगेश्वरी यांच्या दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी पहाटे पांडेश्वर येथून ग्रामस्थांनी आणलेल्या कऱ्हेच्या पाण्याने श्री सिद्धेश्वर महाराज आणि माता जोगेश्वरी यांना स्नान घालण्यात आले व अभिषेक करण्यात आला. ह भप आरती कड महाराज (नायगाव) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा भाविकांनी यावेळी लाभ घेतला. यावेळी मृदंगाची साथ तेजेस खेसे, अक्षय खेसे यांनी दिली. गायन साथ चांगण महाराज, बोरकर महाराज यांनी दिली. भजन साथ नायगाव भजनी मंडळाने दिली. त्यानंतर श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची आरती करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्री सिद्धेश्वर महाराज आणि माता जोगेश्वरी यांची आकर्षक महापूजा गुरव दीपक जगताप यांनी बांधली होती, तर अन्नदान अशोक चोपडा, भानुदास मोरे (बिबवेवाडी), मारुती गायकवाड (वढाणे), विलास मुळीक (यवत), वैभव इभाड (सासवड), सार्थक फडतरे (नायगाव), माणिक चांदगुडे (दंडवाडी)
यांच्या वतीने करण्यात आले असे मनोज जगताप यांनी सांगितले. मंदिर परिसराची स्वच्छता, लाईट, पाणी, दर्शनबारी आदींची उत्तम व्यवस्था केली होती असे राहुल कड यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)