अधिकाऱ्याच्या कार्यालयात नगरसेवकाने सोडले डुक्कर

पिंपरी – थेरगाव परिसरात डुकरांचा सुळसुळाट सुरु आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत दाद मागूनही महापालिका उपाययोजना करत नसल्याच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्या कार्यालयात डुक्कर सोडले आहे.

प्रभाग क्रमांक 24 थेरगाव, गणेशनगर, गुजरनगर, मंगलनगर, वाकड रोड या परिसरात डुक्करांचा सुळसुळाट सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून डुक्करांच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून डुक्करांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांना निवेदन दिले होते. मात्र, त्यावर उपाययोजना झाली नाही.

अखेर सचिन भोसले यांनी महापालिका मुख्यालय गाठले. सोबत आणलेले एक डुक्कर डॉ. अनिल रॉय यांच्या कार्यालयात सोडले. थेरगाव परिसरात 200 ते 300 डुक्करे आहेत. त्यांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त असून महापालिका डुक्करांचा बंदोबस्त करत नाही. त्याच्या निषेधार्थ जिवंत डुक्कर अतिरिक्त आयुक्त, आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेट दिल्याचे, नगरसेवक सचिन भोसले यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)