अधिकाऱ्याची पत्नीसह स्वत: डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्या

कोल्हापुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्या पत्नीची रिव्हॉल्वरने गोळी झाडून खून करून स्वतः डोक्‍यात गोळी झाडून केली आत्महत्या

कोल्हापूर – फ्लॅट मालकिणीला धडा शिकवण्यासाठी कोल्हापुरात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्या पत्नीचा रिव्हॉल्वरने गोळी झाडून खून करून स्वतः डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूरतील देवकर पाणंद परिसरातील विश्वकर्मा कॉम्प्लेक्‍स मध्ये हा प्रकार घडला आहे. घर मालणीच्या तगाद्यामुळे आपण हे कृत्य करत असल्याची चिट्ठी मयत बबन बोबडे यांनी लिहून ठेवली आहे.

कोल्हापुरातील देवकर पाणंद इथे राजलक्ष्मी नगर इथल्या विश्वकर्मा कॉम्प्लेक्‍स मधील पाचव्या मजल्यावर निवृत्त पोलीस अधिकारी बबन पांडुरंग बोबडे आणि रेखा बोबडे हे वृद्ध दाम्पत्य मनीषा घोटगे यांच्या फ्लॅट मध्ये गेली वर्षभर भाड्याने राहत होते. काल रात्री बबन बोबडे यांनी त्यांची पत्नी रेखा हिच्या डोक्‍यात आपल्या रिव्हॉल्वरने गोळी घालून तिचा खून केला, त्या नंतर स्वतःच्या डोक्‍यात त्याच रिव्हॉल्वरने गोळी घालून आत्महत्या केली. मृत्यू पूर्वी त्यांनी आत्महयतेचे करण लिहून ठेवले आहे.

बबन बोबडे हे 8 वर्षा पूर्वी मुंबई येथून सेवा निवृत्त झाले होते. त्यांना 2 मुले आहेत. संतोष हा एक एअर फोर्समध्ये तर दुसरा सचिन हा हॉटेल मध्ये कुक आहे. बबन आणि त्यांच्या पत्नी रेखा हे दोघे मनीषा एम.घोटगे यांच्या फ्लॅट मध्ये 1 वर्षा पासून भाड्याने राहायला आहे . गेल्या 6 महीन्या पासून फ्लॅट खाली करण्या वरून मालक आणि भाडेकरू यांच्यत वाद सुरू आहे. या वादावादी मूळे आपल्या पत्नीची ताबियात बिघडली आहे, या मुळे आपण व्यथित झालो असून आपण हे कृत्य करत असल्याचे चिट्टीत म्हटले आहे.

केवळ घरमलकिणीला अद्दल घडवण्या साठी बबन बोबडे यांनी हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आणखीन 5 चिट्या लिहून ठेवल्या आहेत, त्या मध्ये पेपर चे बिल, मोलकरणीचा पगार, या व इतर गोष्टींची माहिती लिहून ठेवली आहे. रात्री उशिरा बबन बोबडे यांनी झोपलेल्या पत्नीचा खून करून आपनही डोक्‍यात गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. हे कृत्य केल्याने याची माहिती शेजाऱ्यांना ही नव्हती, दुपारी त्यांचे नातेवाईक घरी आल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेची माहिती मिळताच राजवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी फ्लॅट मालक मनीषा घोटगे याची चौकशी करण्यास पोलिसानी सुरवात केली आहे. या घटनेची नोंद राजवाडा पोलिसात झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)